Nashik News : ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Senior Journalist V V Karmarkar passed away on 6 march nashik news

Nashik News : ज्येष्ठ पत्रकार वि. वि. करमरकर यांचे निधन

नाशिक : ज्येष्ठ पत्रकार व क्रीडा पानाचे जनक, अशी ओळख असलेले वि. वि. करमरकर यांचे सोमवारी (ता. ६) निधन झाले. (Senior Journalist V V Karmarkar passed away on 6 march nashik news)

त्यांच्या निधनाने क्रीडा पत्रकारितेत अतुलनीय योगदान देणारा नायक हरपला असल्याची शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

मूळचे नाशिकचे असलेले वि. वि. करमरकर यांनी नाशिकमध्ये आपले उच्चशिक्षण पूर्ण करत, नाशिक शहरातून पत्रकारितेला सुरवात केली. त्यांनी मराठी दैनिकात सर्वांत प्रथम क्रीडा पान सुरू केले. देशी-विदेशी खेळांना मानाचे पान त्यांनी दिले.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्यामुळे क्रीडा पानाचे जनक, अशी ओळख त्यांना मिळाली. समाजवादी विचारांच्या जडणघडणीत तयार झालेल्या करमरकर यांनी आपल्या उभ्या आयुष्यात सतत पारदर्शक कारभाराचा अट्टहास धरला.

क्रिकेटसोबत खो-खो, कबड्डी, कुस्ती या देशी खेळांना आंतरराष्ट्रीय करण्यात त्या त्या संस्थांसह करमरकर यांच्या मार्गदर्शक लेखणीचा खूप मोठा वाटा आहे. करमरकर यांच्या लेखणीला धार होती. खेळ आणि खेळाडूंच्या पलीकडची बातमी वाचकांसमोर ठेवताना त्यांनी एक मोठा कॅनव्हास उभा केला. त्यांच्या लेखणीमुळे खेळांचा प्रचार, प्रसार होत राहिला.

टॅग्स :Nashikdeathjournalist