Winter Update : धुकं, ऊन अन्‌ ढगाळ वातावरणाची अनुभूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Winter Tempreture Update

Nashik Winter Update : धुकं, ऊन अन्‌ ढगाळ वातावरणाची अनुभूती

नाशिक : पावसाची शक्‍यता वर्तविलेली असताना, नाशिक व परिसरात काही काळासाठी ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. त्‍यातच सोमवारी (ता.३०) सकाळी दाट धुके पडले होते. दिवसभरात कधी कडक ऊन तर कधी ढगाळ वातावरणाची अनुभूती नाशिककरांनी घेतली.

दरम्‍यान पाऱ्यात वाढ झालेली असून, नाशिकचे किमान तापमान १५.८ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २८.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. (Sensation of fog sun cloudy weather rise in temperature Minimum temperature 15.8 degrees maximum temperature 28.6 degrees Nashik News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

गेल्‍या काही दिवसांपासून कडाक्‍याची थंडी अनुभवायला मिळत होती. गेल्‍या आठवड्याभरात गार वाऱ्यामुळे वातावरणात गारवा टिकून होता. त्‍यातच हवामान खात्‍याने पावसाचा अंदाज वर्तविला असताना, दिवसभरात काही काळासाठी ढगाळ वातावरण राहिले.

तत्‍पूर्वी पहाटेपासून सकाळी आठपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये धुक्‍याची दुलई पसरलेली होती. दुपारी बारापर्यंत गार वाऱ्यामुळे वातावरणात गारवा होता. मात्र, दुपारनंतर तप्त सुर्यकिरणांमुळे वातावरणातील थंडी गायब झालेली होती.

सायंकाळनंतर पुन्‍हा गार वाऱ्यांमुळे वातावरणात गारवा जाणवत होता. दरम्‍यान काही दिवसांपूर्वी पाऱ्यात घसरण होऊन सात ते आठ अंश सेल्सिअसपर्यंत गेलेल्या तापमानात सध्या वाढ झालेली आहे.

आरोग्‍याची काळजी घेण्याचा सल्‍ला

सध्याच्‍या वातावरणामुळे श्‍वसनाचे विकार असलेल्‍या व्‍यक्‍तींनी विशेष काळजी घेण्याचा सल्‍ला दिला जातो आहे. संसर्गजन्‍य आजार पसरण्यासाठी सध्याचे वातावरण पोषक असल्‍याने सामान्‍यांनीही आरोग्‍याची काळजी घ्यावी, असे डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे.