नाशिक- शहर परिसरातील बंद घरे चोरट्यांच्या टार्गेटवर असून, चोऱ्या-घरफोड्यांचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत. म्हसरुळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन घरफोड्या झाल्या असून, चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी म्हसरुळ पोलिसात घरफोडींचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.