Nashik News : अपघातातील गंभीर जखमी युवतीचाही मृत्यु; बेळगाव ढगा येथे खासगी बसची मोपेडला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

Nashik News : अपघातातील गंभीर जखमी युवतीचाही मृत्यु; बेळगाव ढगा येथे खासगी बसची मोपेडला धडक

नाशिक : बेळगाव ढगा येथे त्र्यंबकेश्‍वरवरून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या खासगी बसचे टायर फुटले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर समोरून येणाऱ्या दुचाक्यांना धडकली.

यात एका महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यु झाला तर, गंभीररित्या जखमी युवतीचा रविवारी (ता. १९) उपचारादरम्यान मृत्यु झाला. सदरील अपघात गेल्या ११ तारखेला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी सातपूर पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (seriously injured girl also died in accident private bus collided with moped at Belgaum Dhaga Nashik News)

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

आकांक्षा ज्ञानेश्वर जाधव (२१, रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) असे उपचारा दरम्यान मयत झालेल्या युवतीचे नाव असून, ओम देवेंद्र तासकर (२१, रा. दिंडोरी) याचा अपघातावेळी जागेवरच मृत्यु झाला होता. गेल्या ११ मार्च रोजी सकाळी आकांक्षा ही ओम तासकर याच्यासमवेत ॲक्टिवा मोपेडवरून (एमएच ४१ सीजी २३६३) त्र्यंबकरोड परिसरातील एका शैक्षणिक संकुलात जात होते.

त्यावेळी त्र्यंबककडून नाशिकच्या दिशेने येत असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सचे चाक फुटले आणि बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावरील दोन दुचाक्यांनी दिली.

यात मोपेडवरील ओम जागेवरच ठार झाला तर आकांक्षा गंभीररित्या जखमी झाल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी (ता. १९) सायंकाळी तिचाही मृत्यु झाला. याप्रकरणी सातपूर पोलिसात अपघाताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NashikAccident Death News