road restoration
esakal
नाशिक: राज्य शासनाच्या सेवा पंधरवड्यांतर्गत जिल्ह्यातील ११६ गावांमधील ९४.३ किलोमीटरचे पाणंद रस्ते मोकळे करण्यात आले. या मोहिमेसाठी स्थानिकांचे चांगले सहकार्य लाभत आहे. रस्ते खुले केल्याने पाच हजारांहून अधिक लोकसंख्येला फायदा होईल, असा विश्वास महसूल प्रशासनाने व्यक्त केला.