Nashik News : अवैध सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करा; जिल्हाधिकारी शर्मा यांचा इशारा
Formation of Special Committee to Investigate Causes : तीन वर्षांत लिंगगुणोत्तरात झालेली घट ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे लिंगगुणोत्तरातील या घसरणीमागील नेमकी कारणमीमांसा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.
नाशिक- जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये गेल्या तीन वर्षांत लिंगगुणोत्तरात झालेली घट ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे लिंगगुणोत्तरातील या घसरणीमागील नेमकी कारणमीमांसा करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.