Nashik Crime: अल्पवयीन बहिण-भावावर अत्याचार; आरोपीला सश्रम कारावास

सदरची घटना एप्रिल २०२२ मध्ये घडली होती.
Jailed
Jailedesakal

नाशिक : घरात कोणी नसताना अल्पवयीन दहा वर्षीय मुलीसह तिच्या आठ वर्षाच्या भावावर लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला नाशिक जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सश्रम कारावास व १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सदरची घटना एप्रिल २०२२ मध्ये घडली होती. (Abuse of minor sibling Rigorous imprisonment for accused Nashik Crime)

शिवाजी सुरेश साळवे (३४, रा. रिलायन्स पेट्रोल पंप, दिंडोरी रोड. मूळ रा. जिंतूर, जि. परभणी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी साळवे याने मुंबई नाका हद्दीत त्याच्या ओळखीतील राहणाऱ्याच्या घरी गेला असता, त्या कामावर गेल्याचे संधी साधून त्यांची १० वर्षांची अल्पवयीन मुलगी व ८ वर्षांचा अल्पवयीन मुलगा यांच्यावर अनैसर्गिकरित्या लैंगिंक अत्याचर केले होते.

याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात पोक्सोसह लैगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सी.एम. श्रीवंत यांनी करीत, सबळ पुरावे गोळा केले आणि न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केला.

Jailed
Nashik Crime: शहरात घरफोड्यांचे सत्र; 4 घटनांमध्ये 7 लाखांचा ऐवज चोरीला

या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. श्रीमती व्ही.एस. मलकलपट्टे-रेड्डी यांच्यासमोर चालले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता सुलभा सांगळे यांनी कामकाज पाहत साक्षीदार तपासले.

सबळ पुराव्यानुसार न्या. श्रीमती व्ही.एम. मलकलपट्टे-रेड्डी यांनी आरोपीला पाच वर्षे सश्रम कारावास व १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून महिला हवालदार शेवंता भोये, हवालदार डी.बी. खैरनार यांनी पाठपुरावा केला

Jailed
Nashik Crime: घातक नायलॉन मांजाची विक्री; 36 हजारांचा मांजा जप्त, दोघांवर गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com