Nashik Crime News : अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण; संशयिताला कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rape news

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीचे लैगिंक शोषण; संशयिताला कारावास

नाशिक : अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्या इच्छेविरुद्ध तिचे लैगिंक शोषण केले. तसेच अश्लील मेसेज व व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य केल्याप्रकरणात जिल्हा न्यायालयाने आरोपीला ९ महिने १५ दिवसांचा साधा कारावास व १० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सोहम प्रवीण वनमाळी (२२, रा. टाकळी रोड, द्वारका) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. (Sexual exploitation of minor girl Imprisonment of suspect Nashik Crime News)

अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीनुसार, नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत सोहमने तिच्या इच्छेविरोधात व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. तसेच बदनामीची धमकी देत तिच्याकडे पैसे मागितले.

या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आरोपी सोहम विरोधात पोक्सोसह विनयभंग, खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक एस.सी. बारेला यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

ॲड. शिरीष कडवे यांनी सरकारी पक्षातर्फे युक्तिवाद करीत साक्षीदार तपासले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एन. भालेराव यांनी आरोपी सोहम यास ९ महिने १५ दिवसांचा साधा कारावास व १० हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दंड न भरल्यास एका महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक एस. एस. गायकवाड, हवालदार पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.