पालिकेला निधी मिळत नसल्याने नगराध्यक्षांचे उपोषण

पालिकेला निधी मिळत नसल्याने नगराध्यक्षांचे उपोषण
Published on: 
पान एक मेन ---------------------- 32591 नंदुरबार : लाक्षणिक उपोषण करताना शहादा नगराध्यक्ष अभिजित पाटील. शेजारी राजेंद्रकुमार गावित, डॉ.अझहर पठाण, रेश्‍मा पवार, कविता सोलंकी. विकासकामासाठी निधी मिळत नसल्याने नगराध्यक्षांचे उपोषण तोडगा काढण्याचे प्रशासनाकडून लेखी आश्‍वासन; विविध पक्षांचा पाठिंबा सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १५ : विकासकामांसाठी शहादा नगरपालिकेला निधी दिला नसल्याने नगराध्यक्ष अभिजित पाटील यांनी गुरुवारी (ता.१५) नंदुरबार येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणाची दखल घेत प्रशासनाने तोडगा काढण्याचे लेखी आश्‍वासन दिल्यावर पाटील यांनी उपोषण स्थगित आले. मात्र योग्य तो निधी न मिळाल्यास पुन्हा आंदोलन केले जाईल, असा इशारा पाटील यांनी यावेळी दिला. जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना जिल्हा नियोजन समितीने विकास कामांसाठी निधी उपलब्ध केला आहे. शहादा शहराला जिल्हा नियोजनामधून निधी मिळावा यासाठी ३० जुलैला १५ कोटींच्या विविध विकास कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पालिकेतील ठराव करून पाठविले होते. मात्र, शहादा पालिकेस एक रुपयाही निधी मिळाला नाही. विकासकामांना निधी मिळत नसल्याने शहरात अनेक समस्या वाढत चालल्या आहेत. निधी मिळावा म्हणून नगराध्यक्ष पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार राजेश पाडवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी, जिल्हा नियोजन अधिकारी यांच्यासह विविध अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना वेळोवेळी साकडे घातले. परंतु आजपर्यंत पालिकेला एक दमडी मिळाली नाही. ------------ उपोषणाला यांचा पाठिंबा यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेसचे आदिवासी विभाग प्रदेशाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक पटेल, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, माजी नगरसेवक विनोद चौधरी, शहराध्यक्ष सागर चौधरी, उपजिल्हाप्रमुख गणेश चित्रकथे, सुभाष पाटील, भगवान अलकारी, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, शांतिलाल साळी, रेश्मा पवार, कविता सोलंकी, माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, अशोक बागुल, प्रकाश जैन, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारुक कुरेशी, नगरसेवक ॲड.दानिश पठाण, डॉ. सुलतान, आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी पाटील यांची भेट घेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा जाहीर केला. ------------- प्रशासनाचे लेखी आश्‍वासन उपोषणस्थळी नगरपालिका विभागाचे सहआयुक्त जमीर लेंगेकर यांनी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांना चर्चेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावत निधी वाटपाच्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आवाहन केले. सायंकाळी श्री. लेंगेकर यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या मागण्या शासन स्तरावर पोहोचवून लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे सांगत उपोषण सोडविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com