

Nashik Shalarth Scam
esakal
नाशिक: राज्यभर गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाबरोबरच संशयित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते शालार्थ आयडी मिळविण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावांची शहानिशा सुरू केली आहे. त्यासाठी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना गुन्हे शाखेत बोलावून कागदपत्रांची कसून तपासणी केली जात आहे.