Education Scam
sakal
नाशिक: शिक्षण उपसंचालक कार्यालयातील ‘शालार्थ’ प्रणालीमध्ये बनावट आयडी तयार करून शासनाची सुमारे १५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात तत्कालीन तीन शिक्षण उपसंचालकांसह ८४१ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात नितीन उपासनी, भाऊसाहेब चव्हाण, नितीन बच्छाव यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.