टुडे पान ३ :
NSK26H31906
जळगाव : शनी अमावस्येनिमित्त शनिपेठेतील शनी मंदिरात झालेली गर्दी.
-----
शनी अमावस्येनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी
महाबळ, बळीरामपेठेसह विविध मंदिरांत रांगा; हजारो लिटर तेल अर्पण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : शनि अमावस्येनिमित्त शनिवारी शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. महाबळ परिसरातील शनी मंदिर, बळीराम पेठेतील शनी मंदिर तसेच पंचमुखी हनुमान मंदिराजवळील शनी मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करण्यासह पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची दिवसभर वर्दळ सुरू होती. शहरातील विविध भागांतील शनी मंदिरांमध्येही भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
शनि अमावस्येला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असल्याने शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरांकडे धाव घेतली. अनेक भाविकांनी कुटुंबीयांसह मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. मंदिरांमध्ये तेल अर्पण करण्यासाठी तसेच पूजा-अर्चा करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढल्याने मंदिर परिसरात दिवसभर वर्दळ दिसून आली.
महाबळ परिसरातील शनी मंदिरात सकाळपासून भाविकांची ये-जा सुरू होती. बळीराम पेठेतील शनी मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पंचमुखी हनुमान मंदिराजवळील शनी मंदिरात शनिदेवाच्या दर्शनासोबतच तेल अर्पण करण्यासाठी भाविकांनी उपस्थिती लावली. शहरातील अन्य भागांतील शनी मंदिरांमध्येही भाविकांनी श्रद्धेने पूजा-अर्चा केली.
सुख-समृद्धीसाठी प्रार्थना
शनि अमावस्येनिमित्त शनिदेवाला तेल अर्पण करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणावर तेल अर्पण केले. मंदिरांमध्ये हजारो लिटर तेल अर्पण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी तेल अर्पण करून प्रार्थना केली. तसेच आपल्या कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि जीवनातील अडचणी दूर होण्यासाठी शनिदेवाला साकडे घातले.
चौकट
धार्मिक वातावरणात पूजा-अर्चा
शनि अमावस्येनिमित्त अनेक भाविकांनी शनिदेवाच्या दर्शनासोबतच धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला. काही भाविकांनी सकाळी लवकर मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास प्राधान्य दिले. दिवसभर मंदिर परिसरात धार्मिक वातावरण होते. श्रद्धा आणि भक्तिभावाने भाविकांनी शनिदेवाची पूजा केली. शहरातील विविध शनी मंदिरांमध्ये झालेल्या गर्दीमुळे शनि अमावस्येचा धार्मिक उत्साह दिसून आला. शनिदेवाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरात दिवसभर वर्दळ कायम होती.