Sharad Pawar: ‘साहेब, शेवटच्या श्‍वासापर्यंत आमच्या काळजात तुम्हीच’! नाशिकच्या कार्यकर्त्यांचे भावनिक पत्र

sharad pawar
sharad pawaresakal
Updated on

Sharad Pawar : साहेब, गल्लीतील सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही लोकप्रतिनिधी, मंत्री केलेत. तुमच्या अडचणीच्या काळात त्यांनी तुमच्याकडे साफ दुर्लक्ष करत सत्ताधारी पक्षाची साथ धरली.

परंतु आमच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत तुम्हीच आमच्या काळजात राहणार आहात’ असे भावनिक पत्र पंचवटीतील राष्टवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने पाठवत सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातील शरद पवारांविषयीची भावना अजूनही तशीच असल्याचे दाखवून दिले. (Sharad Pawar emotional letter from workers of Nashik of NCP nashik)

राष्टवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कालच्या येवला दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

या गर्दीत सहभागी होऊन पवार साहेबांच्या दर्शनासाठी आतूर असलेल्या व राष्टवादी युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदावर कार्यरत असलेल्या किरण पानकर यांनी श्री. पवार यांना भावनिक पत्र देत नेत्यांनी पाठ फिरविली तरी सामान्य कार्यकर्ते अद्यापही श्री. पवार यांच्याबरोबरच असल्याचा विश्‍वास जागविला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sharad pawar
Chhagan Bhujbal on Sharad Pawar: पक्षफुटीला मला का जबाबदार धरताहेत? छगन भुजबळ यांचा पवारांना प्रश्न

साहेब, यापूर्वीही तत्कालीन पुलोद आघाडीचे सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केल्यावर अनेकांनी समाजवादी काँग्रेसची साथ सोडली होती.

मात्र आताचा आघात थेट घरातूनच झाल्याने आपण अधिक व्यथित झाला आहात, परंतु आमच्यासारखे असंख्य तरुण कार्यकर्ते शेवटच्या श्‍वासापर्यंत तुमच्यासोबत असतील, असा विश्‍वास श्री. पानकर यांनी श्री. पवार यांना दिलेल्या पत्रातून जागविला.

तुम्ही पवार नव्हे तर ख-या अर्थाने राजकारणातील प्रभावशाली ‘पॉवर’ असल्याचेही श्री. पानकर यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

sharad pawar
Ajit Pawar News : 'अजित पवारांना व्हिलन केलं जातंय अन् भाजप मजा बघतंय'; रोहित पवारांची टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.