Sharad Pawar : ‘महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली’, आरक्षणावरुन शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
NCP Leadership Training Camp Concludes in Nashik : महाराष्ट्राची सामाजिक वीण विस्कटली जात असून, एका समाजाचे लोक आता दुसऱ्या समाजाच्या घरी, दुकानात जात नाहीत, इथपर्यंत परिस्थिती खालावली आहे, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली.
नाशिक: राज्य सरकारने आरक्षणाबाबत स्वतंत्र समित्या स्थापन करून त्यावर विशिष्ट लोक घेतले आहेत. सरकार हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे असावे. परंतु, या सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा नसून तेढ वाढवायचा आहे.