पर्यटनमंत्र्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रमाच्या मानधनाची शेंद्रीपाडा कलावंतांना प्रतीक्षा

कोण देणार पैसे? कोरोनातील अडचणींमुळे आदिवासींना मदतीची होती आशा
Shendripada artists are waiting for tourism minister Aditya Thackeray visit covid pandemic
Shendripada artists are waiting for tourism minister Aditya Thackeray visit covid pandemicsakal

नाशिक : खरशेत (ता. त्र्यंबकेश्‍वर) भागातील तास नदीवरील बल्ल्यावरून पाणी आणणाऱ्या आदिवासी महिलांच्या व्यथाचे वृत्त ‘सकाळ’मधून प्रसिद्ध होताच, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली. प्रशासनातर्फे लोखंडी पूल उभारण्यात आला. श्री. ठाकरे यांनी पाड्याला भेट दिली असताना शेंद्रीपाडा येथे त्यांच्या स्वागतासाठी आदिवासी कलावंतांना निमंत्रित करण्यात आले होते. श्री. ठाकरे यांनी आदिवासी बांधवांच्या कलेचे कौतुक केले.

या कार्यक्रमासाठी कलावंतांना मानधन देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. पण दीड महिना झाला, तरीही मानधनाचा पत्ता नसल्याची खंत कलावंतांनी व्यक्त केली. मानधन किती ठरले होते, हे सांगत असताना कलावंतांना पैसे कोण देणार? हा प्रश्‍न पडलेला आहे. कोरोना काळात आलेल्या अडचणींच्या परिस्थितीत मानधनाची मदत झाली असते, अशी आशा आदिवासी कलावंतांमध्ये आहे. श्री. ठाकरे यांच्या भेटीवेळी पूल, रस्ता, पिण्यासाठी पाणी आणि वीज देण्याची ग्वाही देण्यात आली.

आदिवासी पारंपारिक नृत्य, बोहाडा, मोर नृत्य करणारे आदिवासी कलावंतांना दुसऱ्या पाड्यावरून मानधन देतो असे सांगून बोलावण्यात आले होते. श्री. ठाकरे यांनी आदिवासी कलावंतांच्या सोबत छायाचित्र घेतले. मोर नृत्य करणारे चंपाबाई आणि कृष्ण भवरे हे त्या दिवशी सकाळपासून आले होते. त्यांना साडेतीन हजार रुपयांचे मानधन देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. वीस किलोचा लाकडी मोर घेऊन हे कलावंत तीन तास नृत्य करत होते. पण आता पैसे देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. त्यामुळे पैसे मिळणार की नाही असा प्रश्न त्यांना पडला आहे. तसेच वाद्य वाजवणाऱ्यांना साडेपाच हजार रुपयांचे मानधन मिळाले नसल्याचे सनई वादक काशिनाथ निंबारे यांनी सांगितले. अधिकारी आले, मंत्र्यांच्या पुढे नृत्य केले अन सारे जण निघून गेले, आम्हाला कुणी विचारले नाही, असे शल्य कलावंत बोलून दाखवत होते.

शेंद्रीपाड्यावर गावातील लोकांनी साडेतीन हजार मिळतील असे सांगून आम्हाला बोलावून घेतले होते. मोराचा नृत्य करत आम्ही स्वागत केले. कोरोनामुळे दोन वर्षे घरी होतो. आता दोन पैसे मिळतील या आशेने आम्ही इथे आलो होतो. पण आमची निराशा झाली. आता पैसे कोण देणार आणि आम्ही कुणाकडे पैसे मागावे? हा प्रश्न आहे.

- चंपाबाई भवरे, मोर नृत्य करणाऱ्या कलावंत

कार्यक्रमात या कलावंतांना आम्ही बोलावले नाही. त्यांना कोणी बोलावले हे माहिती नाही. मी स्वतः गाडी भाडे दिले. अजून मंडप, आचारीचे पैसे देणे बाकी आहे.

- अशोक गावित, ग्रामसेवक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com