Sherwin Kiswe
sakal
बालवयातच बॅटशी मैत्री जोडलेला शर्विन किसवे आता स्थानिक क्रिकेटची रणभूमीत आपल्या धडाकेबाज खेळीने गाजवू लागला आहे. नुकत्याच झालेल्या ‘सकाळ प्रीमियर लीग’मध्ये रोमहर्षक शतक ठोकत त्याने क्रीडाप्रेमींना भुरळ घातली; तर सर्वाधिक धावांची कमाई करीत ‘सर्वोत्कृष्ट फलंदाज’ हा मानाचा किताब पटकावला. या सलग चित्तथरारक प्रदर्शनामुळे ‘रन मशिन’ अशी ओळख पक्की करीत शर्विनने भविष्यात भारतीय संघात झळकण्याचा आपला ध्यासही अधिक ठाम केला आहे.