Chandrakant Gurav : नाशिकच्या शेतकरी संघटनेचा आधारस्तंभ हरपला; चंद्रकांत गुरव यांचे दुखद निधन
Veteran Shetkari Sanghatana Leader Chandrakant Gurav Passes Away : शेतकरी संघटनेचे जुने आणि ज्येष्ठ कार्यकर्ते (कै.) चंद्रकांत गुरव ज्यांनी शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी चळवळीत सक्रिय सहभाग घेतला आणि दुर्लक्षित इगतपुरी तालुक्यात संघटनेचे काम उभे केले. त्यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
नाशिक: शेतकरी संघटनेचे जुने व ज्येष्ठ कार्यकर्ते व शरद जोशींच्या विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक लढाऊ कार्यकर्ते चंद्रकांत गुरव यांचे शनिवारी (ता. १) दीर्घ आजाराने निधन झाले. (कै.) गुरव गेली चार वर्षे आजाराने त्रस्त होते.