
Nashik News: उपक्रमातून विकास साधणारी शेवाळेनगर शाळा; विद्यार्थ्यांमधील बदलांमुळे गावकरी शिक्षकांच्या मदतीला
सोयगाव (जि. नाशिक) : गावात एखाद्या शेजाऱ्यांसोबत भांडण झाले तर मोठे बोलत नाहीत, मग आपणही बोलायचे नाही अशी भूमिका अनेकदा लहान मुले घेतात. मात्र गावातील शिक्षकांनी सुरू केलेल्या मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुलांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधूता रुजली आहे.
एवढेच नव्हे तर मुलांमधील या बदलांमुळे गावकरी देखील शिक्षकांना शाळेच्या विकासासाठी सहकार्य करत आहेत. हा कायापालट झाला आहे. मालेगावपासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या निमगाव केंद्रातील शेवाळे नगरच्या जिल्हा परिषद शाळेत. क्रियाशील शिक्षक देविदास आहिरे व सुनील आहेर या दोघा शिक्षकांमुळे. (Shewalenagar school developing through activities Villagers help teachers due to changes in students Nashik News)
दोघा उपक्रमशील शिक्षकांनी गुणवत्ता, शिस्त व मूल्यवर्धन ही त्रिसूत्री जोपासत शाळा गुणवत्तेकडे नेली आहे. शिक्षकांमुळे शाळेचा कायापालट होत असून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडत आहेत. शाळेत “मूल्य वर्धन’ उपक्रमाची सुरवात झाली.
शालेय दशेतच मुलांमध्ये न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही भारतीय संविधानाचे मूल्य रुजली पाहिजे, यासाठी आठवड्यातील तीन तासांचे वेगळे उपक्रम सुरू करण्यात आले. त्यात गाणी, गोष्टी, खेळ यांचा समावेश करत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यात आली.
विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मागील वर्षी या शाळेत प्रवेश घेतला आहे. शाळेतील विद्यार्थी इंग्रजी वाचतात. वाक्य तयार करतात व सर्व गणिते सोडवता.
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
विद्यार्थ्यांकडून नियम आणि अंमलबजावणी
मुलांनीच शिक्षकांच्या मदतीने वर्गाचे नियम बनवले असून. त्याची अंमलबजावणीही करतात. यात खोट बोलायचे नाही, रोज स्वच्छता झाली पाहिजे, गणवेश स्वच्छ असावा, सर्वांनी एकीने वागायचे, दिलेला अभ्यास पूर्ण करायचा, भांडायचे नाही.
आपली चप्पल स्टँडवर ठेवणे. हसत-खेळत शिक्षणाचा आनंद, इ-लर्निंग, विज्ञान कोडे, विषय रांगोळी, शालेय गीत मंच, बालहक्क जागृती, एक दिवस मुलाखतीचा, व्यसनमुक्ती, विद्यार्थी क्षमता ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देणे. सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचे वाढदिवस, फलक लेखन आदी गोष्टी हिरिरीने करणे
"अल्पविधीतच शाळेचे बाह्यांग आकर्षक झाले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली.शाळेचा चेहरामोहरा बदलणाऱ्या शिक्षकांचे कार्य गावासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे."
- राजेंद्र जगताप, माजी उपसरपंच, शेवाळेनगर
"दोघं शिक्षकांनी शाळेचे रुपडे पालटले आहे.त्यामुळे विद्यार्थी घडत आहेत. विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा प्रगतिपथावर आहे." - अतुल शेवाळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समित