नाशिक- शिवसेना (उबाठा) सोडून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांना विकासकामांसाठी विशेष तरतूद योजनेंतर्गत निधी मंजूर झाल्यानंतर त्या प्राप्त निधीतून सीसीटीव्ही बसविण्यात आले खरे; परंतु आता त्या सीसीटीव्हीचे संचालन पोलिसांकडून केले जाणार आहे. त्यामुळे एकप्रकारे शिंदेसेनेचे नगरसेवक नजरकैदेत आणण्याचा गृह विभागाचा प्रयत्न असल्याच्या चर्चेने शिंदेचे शिवसैनिक धास्तावले आहेत.