शिंदखेड्यात आजपासून बालाजी रथोत्सव, उद्या पालखी सोहळा

शिंदखेड्यात आजपासून बालाजी रथोत्सव, उद्या पालखी सोहळा
Published on: 
SKD26B04376, SKD26B04377 शिंदखेडा : मिरवणुकीसाठी सज्ज असलेला रथ. दुसऱ्या छायाचित्रात बालाजींची मूर्ती. ----------- शिंदखेड्यात आजपासून बालाजी रथोत्सव उद्या पालखी सोहळा : सुदर्शन चक्राची निघणार मिरवणूक सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. २५ : सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या शिंदखेडा येथील श्रीराम बालाजी रथोत्सवाला सोमवार (ता. २६) पासून प्रारंभ होत असून, उद्या (ता. २७) पालखी सोहळा होणार आहे. उत्सवासाठी शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले असून, हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. कोजागरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी सकाळी आठला सुदर्शन चक्राची मिरवणूक रथमार्गाने काढण्यात येणार आहे. परंपरेनुसार गिरासे घराण्यातील धनंजय गिरासे सुदर्शन चक्र डोक्यावर घेण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत. दुपारी अकराला रथ मिरवणुकीला प्रारंभ होईल. देसाई गल्लीतील श्रीराम बालाजी मंदिरात संस्थानचे मठाधिपती हभप मेघश्याम बुवा यांच्या हस्ते बालाजी महाराजांची विधिवत पूजा करण्यात येईल. त्यानंतर राऊळ घराण्यातील हिम्मतसिंह भीमसिंह राऊळ यांच्या हस्ते प्रथम आरती होऊन रथ मिरवणुकीस सुरुवात होईल. देसाई गल्लीतील श्रीराम बालाजी मंदिर, रथ चौक, तेराघर मोहल्ला, माळीवाडा, शनिमंदिर, गणपती मंदिर, गांधी चौक, मेन रोड आणि पुन्हा श्रीराम बालाजी मंदिर असा रथाचा मार्ग राहणार आहे. शिंदखेडा नगरपंचायतीतर्फे रथमार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती केली असून, महावितरणचे कर्मचारी सहकार्य करीत आहेत. यात्रेत खेळणी, भांडी, कटलरी, अल्पोपहारासह विविध दुकाने थाटली आहेत. देविदास देसले, हिम्मतसिंह राऊळ, अरविंद देसाई, योगेश सिंपी, श्रीराम चौधरी, उदय वानखेडे, जीवन भामरे आदी पंच मंडळांनी शहर व तालुक्यातील भाविकांना रथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com