esakal | पठ्ठ्याची भन्नाट आयडिया! जरी शाळा कुलुपबंद; तरी बाळगोपाळांसाठी लढविली भारी शक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

omkar kokangaon.jpg

कोरोनाच्या महामारीत गेल्या सहा महिन्यांपासून शाळा बंद असून  अद्यापही उघडल्या नाही. त्यामुळे चिमुकले मित्र, शिक्षक खडू आणि फळ्यापासून दुरावले आहेत ऑनलाईन शिक्षण सर्वांनाच घेता येत नसल्याने विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. दिवाळीत मामाच्या  गावाला जाण्यापासून ते दिवस कसा घालवावा हा यक्षप्रश्न सतावत आहे. याला मात्र  शिरसगाव येथील  जिल्हा परिषद शाळेचा  इयत्ता पाचवीतील  विद्यार्थी ओमकार रवींद्र बागुल हा अपवाद ठरला.

पठ्ठ्याची भन्नाट आयडिया! जरी शाळा कुलुपबंद; तरी बाळगोपाळांसाठी लढविली भारी शक्कल

sakal_logo
By
मुकुंद भडांगे

कोकणगांव (जि.नाशिक) : कोरोनाच्या महामारीत गेल्या सहा महिन्यांपासून शाळा बंद असून  अद्यापही उघडल्या नाही. त्यामुळे चिमुकले मित्र, शिक्षक खडू आणि फळ्यापासून दुरावले आहेत ऑनलाईन शिक्षण सर्वांनाच घेता येत नसल्याने विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. दिवाळीत मामाच्या  गावाला जाण्यापासून ते दिवस कसा घालवावा हा यक्षप्रश्न सतावत आहे. याला मात्र  शिरसगाव येथील  जिल्हा परिषद शाळेचा  इयत्ता पाचवीतील  विद्यार्थी ओमकार रवींद्र बागुल हा अपवाद ठरला. 

समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण

कोरोना काळात शाळा बंद असल्याने ओंकार व त्याचे मित्र अस्वस्थ होते. या अस्वस्थतेतून त्यांना वाचनालयाची कल्पना सुचली. घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींचा योग्य वापर करून त्यांनी हा उपक्रम राबविला. समाजातील प्रत्येक स्तरातून  चिमुकल्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत असून  शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर चिमुकल्यांच्या संगतीने जागा उपलब्ध करून छोटेखानी वाचनालय उभारून  समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

अनेक जण पुस्तकांच्या प्रेमात

दरम्यान घरामध्ये वाचनासाठी रोजच वृत्तपत्र उपलब्ध असल्याने ओंकार हा सुविचार, दिनविशेष, व बालमित्र पुरवणीतील गोष्टी वाचत असे. त्यातून त्याची वाचनाची आवड निर्माण झाली. तसेच घरामध्ये विविध पुस्तके उपलब्ध असून त्यात महापुरुषांची  चरित्रे, कादंबऱ्या, बालगीते, व विविध  प्रेरणादायी  गोष्टींवरील पुस्तक अडगळीत पडली होती.ओमकारचे काकांनी यासाठी त्याला विविध पुस्तकेही उपलब्ध करून दिली. दररोज त्याचे वर्गमित्र वेगवेगळी गोस्टींची व चरित्रात्मक पुस्तके वाचण्यासाठी घेऊन जातात. आता तर मोठी माणसंही पुस्तकांच्या प्रेमात पडली आहे समाजातील दानशूरांनी या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन बागुल कुटुंबीयांनी केले आहे 

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले


ओमकारचा प्रेरणादायी उपक्रम

चिमुकल्यांनी राबविलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून असे  उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. समाजासाठी हा उपक्रम प्रेरणादायी असून या उपक्रमाची गांवात शिक्षक तसेच सर्व कौतुक करत आहे -कॉम्रेड, बंडू  बागुल (सचिव सिटू संघटना निफाड तथा 
ओमकारचे  काका )

शाळेत चिमुकल्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळावी म्हणून विविध उपक्रम  राबविले जातात. कोरोना काळात तन्वी बागुल व ओमकार  बागुल या बहीण भावांनी राबविलेला  उपक्रम  कौतुकास्पद आहे -अनिल काकडे (उपक्रम शील शिक्षक शिरसगाव )

loading image