फोटो:00824
लामकानी ः शिर्डी पदयात्रेत रोप व श्रीफळ देताना संचालक व ग्रामस्थ.
पर्यावरण संवर्धनाचा
पदयात्रेतून संदेश
सकाळ वृत्तसेवा
लामकानी, ता. १९ : ओम साई सेवा मंडळातर्फे आयोजित लामकानी ते शिर्डी पदयात्रेत यंदा वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. पदयात्रेच्या मार्गावर विविध ठिकाणी जांभूळ, कडुनिंब, चिंच व वडाच्या रोपांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात आहे. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
लामकानी ते शिर्डी पदयात्रेचे यंदा १९ वे वर्ष आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रावसाहेब गिरासे यांच्या हस्ते पदयात्रेला प्रारंभ झाला. पदयात्रेच्या माध्यमातून दर वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्वच्छतेतून सुदृढ आरोग्य, ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, पाणीबचतीचे महत्त्व, रक्तदान शिबिर तसेच शेतशिवारात पाणलोट विकासाचे फायदे यांसारखे संदेश यापूर्वी देण्यात आले आहेत. यंदा दुष्काळीमुळे वृक्षसंवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. केवळ रोपे लावणे नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणेही काळाची गरज असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. पंचायत समितीचे माजी सदस्य तुषार महाले, माजी सरपंच रवी गिरासे, के. पी. पाकळे, हितेश कासार, एन. पी. येवले, निंबा महाले, भटू पाटील, शैलेश शिरसाठ, रूपेश कलंके, प्रवीण सावळे, धनंजय येवले, सुदर्शन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.