नाशिक- नाशिक-शिर्डी रस्त्याचे चार पदरीकरण होणार आहे. यासाठी १६५ कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे सिन्नर संगमनेर मार्गावरील राहणाऱ्या नागरिकांना शिर्डीसाठी एक जलद अशी कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे. शिर्डी कडे जात असताना नांदूरशिंगोटे, निर्मळ पिंपरी-निमोण २२ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यामुळे भाविकांचा प्रवास सुलभ होणार आहे.