
Shiv Jayanti 2023 : पंचवटीत महिलांच्या हस्ते शिवरायांची महाआरती
पंचवटी (जि. नाशिक) : पंचवटी शिवजन्मोत्सव समिती व मालेगाव स्टॅण्ड मित्रमंडळातर्फे मालेगाव स्टॅण्ड व पंचवटी कारंजा येथील किल्ल्यांच्या प्रतिकृतीच्या ठिकाणी रात्री बाराला महाआरती करण्यात आली.
तसेच फटाक्यांची आतषबाजी केली. पालकमंत्री दादा भुसे, माजीमंत्री छगन भुजबळ, आमदार राहुल ढिकले, सुनील बागूल आदींसह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. शिवरायांच्या पुतळ्यास हार अर्पण केला.
मालेगाव स्टॅण्ड येथे स्थानिक महिलांच्या हस्ते शिवरायांची महाआरती करण्यात आली. (Shiv Jayanti 2023 Maha Aarti of Lord Shiva by women in Panchavati nashik news)
पंचवटी कारंजा येथेल रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर मालेगाव स्टॅण्ड येथे आरोग्य तपासणी शिबिर घेतले. या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंचवटी कारंजा मालेगांव स्टॅण्ड येथील किल्ल्याची प्रतिकृती, अश्वारूढ उभारण्यात आलेल्या पूतळा, हिरावाडी येथील राजांचा आरमार आकर्षण ठरले.
अनेक मुलां-मुलींनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून देखाव्यांच्या ठिकाणी उपस्थित होते, ते उत्सवातील आकर्षण ठरत होते. देखावे बघण्यासाठी पंचवटी परिसरात गर्दी झाली होती.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
देखाव्यांसह सेल्फी घेण्यात अनेकजण मग्न होत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसले. म्हसरुळ येथील शिवराम मंदिर, स्वाध्याय नगर येथील शिवाजी महाराजांच्या मंदिरातील पूर्णाकृती पूतळ्यास दुग्धाभिषेक, महापूजा व आरती करण्यात आले.
नांदूर-मानूर शिवजन्मोत्सव समिती यांच्यातर्फे नांदूरनाका, आडगाव शिवजन्मोत्सव समितीतर्फे आडगाव तसेच, पेठरोड, तारवाला नगर, म्हसरुळ, मखमलाबाद, मानूर, कोणार्कनगर, मेरी, आरटीओ कॉर्नर, गणेश चौक, शरयू पार्क येथील चौकाचौकात स्टेज उभारून शिवरायांच्या पूतळ्याचे पूजन, आरती करून उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.