Khelo India : मनमाडच्या विना आहेरला वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक

khelo india
khelo indiaesakal

मनमाड (जि. नाशिक) : पटणा (बिहार) येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया (Khelo India) महिला मानांकन राष्ट्रिय वेटलिफ्टिंग स्पर्धेत येथील वीनाताई आहेर हिने नवीन राष्ट्रीय विक्रमासह ४० किलो वजनी

गटात सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.(veena aher of Manmad wins gold medal in weightlifting in khelo india youth game nashik news)

५४ किलो स्नॅच व ७३ किलो क्लिनजर्क असे एकूण १२७ किलो वजन उचलून तीने ही विक्रमी कामगिरी केली. नुकत्याच इंदोर येथे झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये विनाने क्लिनजर्कचा स्वतःचाच ७२ किलोचा रेकॉर्ड मोडीत काढत ७३ किलोचा नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सर्वांची वाहवा मिळविली.

गेल्या तीन वर्षांपासून मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळेचे खेळाडू छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शनाने सातत्त्याने राष्ट्रीय स्तरावर नवनविन विक्रम स्थापित करीत आहेत. आकांक्षा व्यवहारे, मुकुंद आहेर व आता विना आहेरने जोरदार कामगिरी केली.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

khelo india
Smallest Portrait Rangoli: महाराजांची जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी!

विना सध्या कला वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात १२वीत शिकत आहे. ४५ किलो ज्युनियर वजनी गटात वीनाची लहान बहीण व छत्रे विद्यालयाची खेळाडू मेघा संतोष आहेर हिने ५६ किलो स्नॅच व ७९ किलो क्लिन जर्क असे १३५ किलो वजन उचलून चौथा क्रमांक व रोख सहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून आपल्या पहिल्याच खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत उत्तम कामगिरी केली.

यशस्वी खेळाडूंना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, जय भवानी व्यायामशाळेचे मोहन गायकवाड, डॉ. सुनील बागरेचा, छत्रे विद्यालयाचे मुख्यध्यापक रमेश केदारे, कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

khelo india
Dada Bhuse : जलजीवन योजनेमुळे प्रत्येकाला शुध्द पाणी : दादा भुसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com