Shiv Janmotsav 2023 : निश्चयाचा महामेरु...बहुत जनांसी आधारु! नाशिकरोडला शिवजन्मोत्सव उत्साहात

A crowd of Shiva lovers gathered to greet the statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
A crowd of Shiva lovers gathered to greet the statue of Chhatrapati Shivaji Maharaj.esaka

नाशिक रोड : छत्रपती शिवाजी महाराज की जय...जय भवानी.., राजमाता जिजाऊ की जय.., छत्रपती संभाजी राजे की जय अशा जयघोषांनी नाशिकरोड येथील प्रत्येक चौक दुमदुमून गेला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा नाशिकरोड परिसरात उत्साहात करण्यात आला. दिवसभर निघालेल्या मिरवणुकीत एकूण ११ चित्ररथ सहभागी झाले होते. (Shiv jayanti 2023 Nashik Road in excitement nashik news)

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त नाशिकरोड परिसर भगवामय झाले होते. परिसरातील जेलरोड, देवळालीगाव, विहितगाव, चेहडी, शिंदे, पळसे, नेहरूनगर, उपनगर, गांधीनगर, दसक, पंचक आदी सर्वच भागात भगवे ध्वज, पताका कमानी उभारून परिसर सुशोभित करण्यात आला होता.

नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक व जेल रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात विद्युत रोषणाईसह आकर्षक देखावा उभारण्यात आला. मध्यरात्री हजारो शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती.

शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही ठिकाणी आरती करण्यात आली. रात्री दोनपर्यंत हा जल्लोष सुरू होता.

ठीक ठिकाणी सार्वजनिक मंडळे व शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने देखावे उभारण्यात आले होते. शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध ठिकाणी विविध मंडळाच्यावतीने आकर्षक चित्ररथ बनवून मिरवणुका काढण्यात आल्या.

मिरवणुकींमध्ये लेझीम ढोल ताशा तसेच, भगवे फेटे घातलेले पुरुष व महिला मिरवणुकीस सहभागी होते. रस्त्याच्या दुतर्फा मिरवणूक बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

A crowd of Shiva lovers gathered to greet the statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
Shiv Jayanti 2023 : मालेगावला शिवजयंतीचा जल्लोष; शिवतिर्थावर लोटला जनसागर

शिवजन्मोत्सव सोहळा समिती, भगवान वाल्मीक वीर गोगाजी रामदेव फाउंडेशन, छत्रपती फाउंडेशन, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक वडनेर गेट, सप्तशृंगी कला क्रीडा मंडळ, शिवरत्न सांस्कृतिक व क्रीडा मित्र मंडळ, ओमकार मित्र मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज कला क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, सुरभी सोशल ग्रुप,

उपनगर नाका मित्र मंडळ, जिजामाता नगर कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ, ब्लुबेल हायस्कूल, एम.जे. मित्र मंडळ, शिवजन्मोत्सव सोहळा समिती जेलरोड, तरुण महाराष्ट्र मित्र मंडळ सिन्नर फाटा, शिवा भागवत फ्रेंड सर्कल,

संग्राम मित्र मंडळ, सिन्नर फाटा, शिवजन्मोत्सव सोहळा समिती शिंदे गाव, देवळाली गाव जन्मोत्सव समिती, वाघोबा महाराज मित्र मंडळ सुंदर नगर, राजधानी चौक मित्र मंडळ दत्त मंदिर चौक, नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती विहितगाव, आदी मंडळांनी देखावे सादर केले.

शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने नाशिक रोड व जेलरोड येथे उभारण्यात आलेल्या देखाव्याला व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. खासदार हेमंत गोडसे,

आमदार राहुल ढिकले, माजी आमदार योगेश घोलप, शिवसेना उपनेते बबनराव घोलप, नाशिक जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, योगेश गाडेकर, निवृत्ती आरिंगळे आदी उपस्थित होते.

A crowd of Shiva lovers gathered to greet the statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
Shiv Jayanti 2023 : येवल्यात भव्यदिव्य मिरवणुकीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा! काठी- बनाट फिरविण्याचे खेळ

जयंती मुळे नाशिक रोड परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून चौकात बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणूक काळात वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला. सायंकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली.

देवळाली गावात परवानगी नाकारली

गेल्या महिन्यात देवळाली गाव येथे शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात शिवजन्मोत्सव सोहळा जयंती उत्सवानिमित्त बैठक झाली. या बैठकीत हिशोब मागण्याच्या कारणावरून वाद झाला. त्यामुळे या वादाचे पर्यावरण गोळीबारात झाले होते.

परिणामी देवळाली गावातील वातावरण गेल्या काही दिवसापासून तणावपूर्ण आहे. चार दिवसापूर्वी मंडप टाकण्यावरून देवळाली गावात पुन्हा वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हा वाद मिटवला. परंतु, शिवजंयतीला शिवजन्मोत्सव सोहळ्यात वाद होऊ नये म्हणून देवळाली गाव येथे दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आली

A crowd of Shiva lovers gathered to greet the statue of Chhatrapati Shivaji Maharaj.
Dhule Shiv Jayanti 2023 : शान कोणाची फक्त आमच्या शिवबांची..! शहर- जिल्ह्यात अभिवादन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com