नाशिक- मस्साजोगचे (जि.बीड) सरपंच संतोष देखमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी व समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात शिवसेनेच्या वतीने पक्ष कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राज्य गुन्हेन्वेषण विभागाकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले.