नाशिक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेवर भगवा फडकावण्यासाठी तयारीला लागावे. निवडणुकीत प्रत्येक जागेवर आपल्या पक्षाचा उमेदवार तयार ठेवावा, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिवसैनिकांना दिले.