ॲंकर
जि. प. पंचायत समितीच्या तयारीला लागा
आहेर : शिवसेना (उबाठा) आढावा बैठक उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कळवण ता ३ : वाढती महागाई रोखण्यात देशातील व राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली सत्ता बदलाचे वारे वाहत असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागावे असे आवाहन शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख नितीन आहेर यांनी केले.
कळवण तालुका शिवसेनेची आढावा बैठक अभोणा येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे तालुक्यातील अभोणा, कनाशी, पुनदनगर व मानूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. लोकसभा सहसंपर्कप्रमुख राजु पाटील, दिंडोरी लोकसभा प्रमुख कारभारी आहेर, विधानसभा संपर्कप्रमुख रवींद्र धनावडे, तालुकाप्रमुख अंबादास जाधव आदी उपस्थित होते. यावेळी तालुकाप्रमुख अंबादास जाधव, सर्जेराव सावंत, संभाजी पवार, विनोद भालेराव, माजी तालुकाप्रमुख भास्कर भालेराव,युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे,शहरप्रमुख अजय पगार, उपशहर प्रमुख विनोद मालपुरे, युवा सेनेचे शहराध्यक्ष सुनिल पगार, राजू वाघ आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी निवड जाहीर करण्यात आली.
चौकट
नवनियुक्त पदाधिकारी असे
विधानसभा संघटक प्रकाश भालेराव, तालुका संघटक अमजद खान, तालुका समन्वयक संजय रौदळ, कळवण उपशहरप्रमुख विनोद मालपुरे, उपतालुकाप्रमुख गिरिश गवळी, निलेश आहेर, आनिल पवार, तुळशिराम आहेर, डॉ दिनेश बागुल, विभाग प्रमुख संदीप पाटील, जयवंत मोरे, संजय बागुल, मधुकर मोरे, गणप्रमुख विनोद पवार, संजय गायकवाड, काळु ठाकरे, बबन सोनवणे, सुरेश चौधरी, राजेंद्र महाले, सप्तशृंगी गड शहर प्रमुख तेजस बेनके, आभोणा शहरप्रमुख पवन काकरे, शहरसंघटक संजय पाटील, उपशहर प्रमुख राजेंद्र हिरे, मनोज जाधव, कनाशी शहरप्रमुख आरिफ सय्यद, सप्तशृंगी गड उपशहर प्रमुख वैभव जहागीरदार, सप्तशृंगी शहर संघटक अमोल गव्हाणे.
कळवण : मेळाव्याला उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकारी व शिवसौनिक