नाशिक: बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना (उबाठा) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून १२ सप्टेंबरला जिल्ह्याधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला जाणार आहे. तसेच महापालिकेकडून शासनाला सादर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेत फेरफार झाल्याचा आरोप मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील व शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी केला आहे.