नाशिक- हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उबाठा) व मनसेकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी होत असताना राज्य शासनाने अध्यादेश मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर मोर्चाचे रूपांतर आता विजयी मेळाव्यात केले जाणार आहे. ५ जुलैला शिवसेना व मनसेचा संयुक्त मेळावा वरळी येथे होणार असून, नाशिकमधून दोन्ही पक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. शिवसेना भवनमध्ये बुधवारी (ता. २) झालेल्या बैठकीत याबाबत निर्धार करण्यात आला.