esakal | आयुक्तांवरील नाराजी हा भाजपचा निव्वळ बालहट्ट

बोलून बातमी शोधा

bjp vs shivsena
आयुक्तांवरील नाराजी हा भाजपचा निव्वळ बालहट्ट
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : प्रशासनप्रमुख म्हणून कोविड लढ्यासाठी आयुक्त कैलास जाधव ( Kailas Jadhav) यांना सर्वाधिकार दिले असताना ऑक्सिजन प्लांटची पाहणी करण्यासाठी महापौरांना निमंत्रित न केल्याने कांगावा करणाऱ्या भाजपचा(BJP) हा निव्वळ बालहट्ट असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste) यांनी भाजपवर केली आहे. (BJPs municipal group leader Jagdish Patil had expressed displeasure as the commissioner was not taking the mayor with him)

भाजपचा आव, कि नुसताच कांगावा?

भाजपचे महापालिकेतील गटनेते जगदीश पाटील यांनी आयुक्त महापौरांना सोबत घेऊन जात नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यावर शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. बोरस्ते म्हणाले, की कोविडच्या पार्श्‍वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी गटनेत्यांची बैठक घेऊन कोविड संदर्भात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आयुक्त जाधव यांना दिले होते. कोरोना महामारीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी जसे ऑक्सिजन पुरविणे, इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून देणे किंवा वैद्यकीय कामांसाठी तातडीने मंजुरी देणे आदींचे अधिकार दिले असताना आता आयुक्तांच्या कामात अडथळा आणला जात आहे. रविवारी (ता. २०) आयुक्त जाधव यांनी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी काही जागांची पाहणी केली. नाशिकमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असताना तातडीने ऑक्सिजन प्लांट (Oxygen Plant) तयार होणे आवश्यक असताना आयुक्तांनी आम्हाला का बरोबर नेले नाही, आयुक्त एकटे गेलेच कसे, अशी मागणी करत नाराजी व्यक्त करणाऱ्या भाजप गटनेत्यांचा हा बालहट्टच असल्याचे बोरस्ते म्हणाले.

हेही वाचा: Fact Check : नाकात लिंबाचा रस टाकल्यास कोरोना जातो?

शिवसेना आयुक्तांच्या पाठीशी

कोरोना महामारीमध्ये प्रशासनाला पाठिंब्याची गरज आहे. या आपत्कालीन परिस्थितीत आयुक्तांच्या पाठीशी आहे. आयुक्तांनी त्वरित योग्य निर्णय घ्यावेत, ऑक्सिजन प्लांट उभारावेत, नाशिकला या ऑक्सिजनच्या तुटवड्यातून बाहेर काढावे, अशी मागणी बोरस्ते यांनी केली.

(BJPs municipal group leader Jagdish Patil had expressed displeasure as the commissioner was not taking the mayor with him)

हेही वाचा: खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती