Nashik News: नांदगावच्या शिवसृष्टीला मिळाली चालना; शिवप्रेमींसाठी प्रेरणादायी वास्तू उभारणीच्या कामाला प्रारंभ!

suhas kande latest marathi news
suhas kande latest marathi newsesakal

नांदगाव (जि. नाशिक) : शिवकालीन इतिहास, संस्कृती, व पारंपारिक वारसा आणि अनुभव असा एकत्रित प्रतिबिंबित सौंदर्यानुभव देणाऱ्या येथील शिवसृष्टी नजीकच्या काळात उभारण्यासाठीचा मार्ग अखेर मोकळा होऊन त्यासंबंधीचे काम निविदा प्रक्रियेवर अंतिम टप्प्यात आली आहे.

२० कोटी रुपये खर्चाच्या १.२१ हेक्टरवर शिवसृष्टी आकाराला येत आहे. आमदार सुहास कांदे यांनी त्याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे नियोजित शिवसृष्टी वैभवशाली कलाशैलीचे प्रतीक ठरणार आहे. (Shiv Srishti of Nandgaon got boost Inspirational building work for Shiva lovers started initiative by suhas kande Nashik News)

संभाव्य शिवसृष्टीचे संकल्पचित्र
संभाव्य शिवसृष्टीचे संकल्पचित्रesakal

पहिल्या टप्प्यातील संरक्षक भिंतीच्या दोन कोटीच्या कामाला प्रारंभ होणार आहे. पंचायत समिती नव्या प्रशासकीय मध्यवर्ती संकुलात पंचायत समिती स्थलांतरित झाल्यामुळे जुन्या जागेवर वापराविना पडून राहिलेली वास्तू अखेर पाडण्यात आली आहे.

जुन्या पंचायत समितीच्या जागेवर शिव सृष्टीच्या कामाला प्रारंभ होण्याचे संकेत मिळाले आहेत. या शिवसृष्टीत संपादित करण्यात आलेल्या मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सत्तावीस फूट उंचीचा ब्राँझ धातूचा अश्वारूढ अवाढव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे.

त्यासाठीचे कामही अंतिम टप्प्यात पूर्ण होत आले आहे. शिवसृष्टीची संरक्षक भिंत देखील आगळी वेगळी असणार आहे. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर आधारित ऐतिहासिक अशी मात्र वर्षांनुवर्षे चांगल्या स्थितीत व सुरक्षित राहणारे ‘म्युरल्स’ ची भित्तिचित्रे साकारली जाणार आहेत.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

suhas kande latest marathi news
Nashik NMC News : विकास शुल्क वाढल्यास घरांच्या किमती वाढणार! पाचपटीने शुल्क वाढविण्याची तयारी

तसेच संग्रालयात युद्धनीती शिवरायांचे किल्ले त्यांनी वापरलेली शस्त्रे या वस्तूंच्या प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. याशिवाय वाचनालय देखील ऑन त्यात छत्रपतींच्या जीवनावरील विपुल अशी ग्रंथ संपदा वाचकांसाठी ठेवण्यात येणार आहे. छोटेखानी अँपी थिएटर असून त्यावर शिवकालीन प्रेरणा देणारे व्हिडिओग्राफी चित्रपट दाखविले जाणार आहेत.

"छत्रपती संभाजीराजे व शिवप्रेमी जनतेला दिलेला शब्द पाळला कबूल केल्याप्रमाणे शिवसृष्टी आता मूर्त स्वरूपात उभी राहत असल्याचा शिवप्रेमी लोकप्रतिनिधी म्हणून आनंद वाटत आहे."

-सुहास कांदे, आमदार

suhas kande latest marathi news
Sugarcane Crop : कारखान्यांकडून उसाची शोधाशोध; उसाचे क्षेत्र घटले, यंदा ‘धुराडे’ होणार लवकर बंद!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com