रिडिंग घेणाऱ्यांकडूनच आकड्यांची हेराफेरी

रिडिंग घेणाऱ्यांकडूनच आकड्यांची हेराफेरी
Published on: 
मेन फिचर टुडे २ ----------- (संबंधित एआय चित्र वापरावे) --- रीडिंग घेणाऱ्यांकडूनच आकड्यांची हेराफेरी शिवाजीनगरात पैसे घेऊन कमी रीडिंग केले जात असल्याच्या प्रकाराची चर्चा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ८ : वीजचोरीला आळा घालण्यासाठी ‘महावितरण’कडून स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरात मीटर रीडिंगच्या नोंदीबाबत गंभीर आरोप होत आहेत. मीटरवरील प्रत्यक्ष रिडिंगपेक्षा कमी आकडा नोंदविण्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. त्यामुळे वीजचोरी रोखण्यासाठी आधुनिक यंत्रणा उभारली जात असताना रीडिंग घेण्याच्या प्रक्रियेतच गैरप्रकार होत असल्याची माहिती समोर येत आहे. महावितरणच्या नियमानुसार शहरातील बहुतांश ग्राहकांच्या वीज मीटरचे रीडिंग दर महिन्याला ठराविक कालावधीत घेतले जाते. साधारणपणे १० ते १५ तारखेच्या दरम्यान रीडिंग घेण्यासाठी संबंधित व्यक्ती ग्राहकांच्या घरी भेट देतात. ही प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने संबंधित एजन्सी किंवा कर्मचाऱ्यांमार्फत केली जाते. याच प्रक्रियेचा गैरफायदा घेत काही ठिकाणी ग्राहकांकडून पैसे स्वीकारून मीटरवरील प्रत्यक्ष वापरापेक्षा कमी रीडिंग नोंदविले जात असल्याचा माहिती नागरिकांकडून मिळाली आहे. महसुलावर परिणाम स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वाढल्याच्या तक्रारी काही ग्राहकांकडून होत आहेत. त्यामुळे बिलाची रक्कम कमी करण्यासाठी काही ग्राहकांकडूनच रीडिंग कमी दाखविण्याची मागणी केली जाते आणि त्यासाठी संबंधित व्यक्तींकडून पैशांची मागणी होत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मीटरवरील नोंद आणि बिलातील वापर यामध्ये तफावत निर्माण होत असल्यास त्याचा परिणाम महावितरणच्या महसूल व्यवस्थेवरही होऊ शकतो. अनधिकृत जोडणीचे प्रकार दरम्यान, काही भागात पैसे घेऊन अनधिकृत पद्धतीने वीज जोडणी, जोडणीमध्ये हस्तक्षेप किंवा बायपास करण्याच्या प्रकारांचीही चर्चा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या आरोपांमध्ये तथ्य आहे की नाही, याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. चौकट गांभीर्याने दखल घेण्याची मागणी स्मार्ट मीटरमुळे वीज वापराची अचूक नोंद आणि वीज चोरीला आळा घालण्याचा उद्देश असताना, रीडिंग प्रक्रियेतच गैरप्रकार होत असतील तर संपूर्ण यंत्रणेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजनगर परिसरातील तक्रारींची महावितरणने गांभीर्याने दखल घेऊन रीडिंग प्रक्रिया, कंत्राटी कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती आणि अनधिकृत जोडण्यांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोट पैसे घेऊन कमी रीडिंग दाखविण्याबाबत कोणी प्रलोभन देत असेल तर वीज ग्राहकांनी त्याला बळी पडू नये. असे प्रकार होत आहे का? या बाबत माहिती घेऊन कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करू. अनधिकृत जोडणी किंवा ‘बायपास कनेक्शन’ करणाऱ्यांवर यापूर्वी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. अजून कोणी असे प्रकार केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करू. - दत्तात्रेय साळी, कार्यकारी अभियंता, शहर विभाग, महावितरण.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com