नाशिक- जिल्ह्यातील काही शिवभोजन केंद्रांमध्ये एकाच लाभार्थ्याचे छायाचित्र दोन ते तीन वेळा सादर करण्यात आल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी केंद्रचालकांना तीन महिन्यांचे लाभार्थी छायाचित्रे व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.