नाशिक- महापालिका व नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. हे प्रात्यक्षिक सव्यसाची गुरुकुलमधील लखन जाधव गुरुजी व त्यांच्या शिष्यांनी सादर केले. उपक्रमात रविवारी (ता. ३०) शहराच्या विविध भागांतून नववर्ष स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे.