Shivputra Sambhaji Mahanatya: धडाडणाऱ्या तोफा, आतषबाजी; शिवपुत्र संभाजी महानाट्याने जिंकली मने!

Nashik:  episode of Sambhaji Maharaj's ascension to the throne in 'Shivaputra Sambhaji' 
Mahanathya Dr. Prajakta Gaikwad as Amol Kolhe and Maharani Yesubai.
Nashik: episode of Sambhaji Maharaj's ascension to the throne in 'Shivaputra Sambhaji' Mahanathya Dr. Prajakta Gaikwad as Amol Kolhe and Maharani Yesubai.esakal
Updated on

नाशिक : धडाडणाऱ्या तोफा, घोड्यांच्या टापांचा आवाज, तुतारीच्या निनादातील नेत्रदीपक राज्यरोहण सोहळा, नयनरम्य आतषबाजी, दीडशे फुटांचा रंगमंच आणि सोबतीला डॉ. अमोल कोल्हे व डॉ. गिरीश ओक यांच्या भारदस्त आवाजातील दमदार संवादांनी परमोच्च बिंदू साधणाऱ्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याने काळजाचाच ठाव घेत स्वराज्याचा धगधगता इतिहास सादर केला. (shivputra sambhaji mahanatya Won hearts of Nashik citizen nashik news)

गोदातीरी थंडगार बोचऱ्या वाऱ्यांतही महानाट्याचा आविष्कार पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी नाशिककरांनी गर्दी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तर ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या रसिकांच्या घोषणांनी अवघा परिसर दणाणून सोडला होता.

नाशिक-औरंगाबाद रोडवरील तपोवनच्या साधुग्राममधील स्व. बाबूशेठ केला मैदानावर महेंद्र महाडिकलिखित व दिग्दर्शित आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे अभिनित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा नाशिकमधील शुभारंभाचा प्रयोग सादर झाला. सुमारे दीडशे फुटांच्या उभारण्यात आलेल्या किल्ल्याची भव्य प्रतिकृती असलेल्या मंचावर स्वराज्याचा इतिहासच जणू अवरतला.

मंचासमोरून घोड्यांची स्वारी, मावळ्यांची धावपळ अन्‌ संभाजी महाराजांच्या प्रवेशाला हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नाशिककरांनी शिट्ट्या वाजवून दाद दिली.

महानाट्यात पुरंदर किल्ल्यावर शंभूराजेंचा जन्म, बारसे, शिवराज्याभिषेक, औरंगजेबाच्या तावडीतून सुटका, जंजिरा मोहीम, छत्रपती संभाजी महाराज आणि अनाजी पंतांची कटकारस्थाने, त्र्यंबकराव वाडकरांची कन्या गोदाचे अपहरण आणि शंभूराजेंना बदनामीची कारस्थानांची दृश्ये मंचावर सादर झाली.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Nashik:  episode of Sambhaji Maharaj's ascension to the throne in 'Shivaputra Sambhaji' 
Mahanathya Dr. Prajakta Gaikwad as Amol Kolhe and Maharani Yesubai.
Nashik News: द्राक्ष निर्यातदारांना पेमेंटसाठी ‘वेट ॲन्ड वॉच’

यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीतील एक-एक घटना रंगमंचावर सादर करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्यदिव्य असा राज्याभिषेक सोहळाही रंगमंचावर सादर झाला.

मध्यंतरानंतर, संभाजी महाराज आणि मुघल सम्राट औरंगजेब यांच्यातील जुगलबंदी रसिकांना पाहावयास मिळाली. सरतेशेवटी संभाजी महाराजांचा छळ करून करण्यात आलेल्या हत्येच्या प्रसंगाने प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणले.

सुमारे दोनशे कलावंतांचा सहभाग

भव्यदिव्य रंगमंचावर सुमारे दोनशे कलावंतांच्या सहभागाने महानाट्य आकाराला आले. येत्या २६ तारखेपर्यंत सादर होणाऱ्या या महानाट्याने साक्षात स्वराज्यच नाशिककरांच्या समोर उभे केले.

या महानाट्यात स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाड, महेश कोकाटे, रमेश रोकडे, अजय तापकिरे आणि दुहेरी भूमिकेत विश्वजित फडते यांनी दमदार अभिनय सादर केला.

या महानाट्यात नाशिकमधील ११० कलावंतांनीही भूमिका साकारल्या असून, याशिवाय ९० कलावंतांसह सुमारे २०० कलावंतांनी नाशिककरांना तीन तास खिळवून ठेवले.

भुजबळ, सपकाळ कुटुंबीयांची उपस्थिती

शिवपुत्र संभाजी महानाट्याचे दीपप्रज्वलन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले. माजी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ, सपकाळ नॉलेज हबचे रवींद्र सपकाळ, कल्याणी सपकाळ, पराग सपकाळ यांच्यासह अभिनेत्री सायली संजीव, जयप्रकाश जातेगावकर, योगेश कमोद, नानाजी निकुंभ, रंजन ठाकरे, ॲड. रवींद्र पगार आदी उपस्थित होते. रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते अश्‍वपूजन, तर कल्याणी सपकाळ यांच्या हस्ते देवीची आरती झाली.

Nashik:  episode of Sambhaji Maharaj's ascension to the throne in 'Shivaputra Sambhaji' 
Mahanathya Dr. Prajakta Gaikwad as Amol Kolhe and Maharani Yesubai.
Nashik News: ‘वसाका’ निवृत्त कर्मचारी पगार न मिळाल्याने आक्रमक; अनेकांंवर उपासमारीची वेळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com