
शिवसेना आमदारांची छगन भुजबळांविरोधात हायकोर्टात धाव
नाशिक : महाविकास आघाडीत (mahavikas aghadi) सध्या बिघाडी असल्याचं चित्र दिसत आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे (shivsena mla suhas kande) यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे, यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे.
भुजबळांविरोधात पाचशे पुरावे - सुहास कांदे
काही दिवसांपूर्वी सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यात एका बैठकीत खडाजंगी झाली होती. त्यानंतर भुजबळांविरोधात कांदेंनी हायकोर्टात धाव घेतल्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. या प्रकरणी याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.
पंचनामे करण्याच्या मुद्यावरुन खडाजंगी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात (ता.११) मोठी शाब्दिक चकमक झाला होती. आपत्कालीन निधी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याच्या मुद्यावरुन पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुहास कांदे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. नाशिकमधील नांदगावमध्ये हा प्रकार घडला आहे. सुहास कांदे यांनी सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र तातडीच्या मदतीवरुन दोघांमध्ये सुरु झालेली बाचाबाची, बाहेर पडेपर्यंत थांबलीच नाही. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.सुहास कांदे यांनी सांगली-कोल्हापूरच्या महापुरावेळी जशी मदत दिली होती, तशीच तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली. त्यावेळी छगन भुजबळ यांनीही त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. मात्र तातडीच्या मदतीवरुन दोघांमध्ये सुरु झालेली बाचाबाची, बाहेर पडेपर्यंत थांबलीच नाही. सुहास कांदे यांच्या समर्थकांनी त्याचवेळी घोषणाबाजीही केली.
Web Title: Shivsena Mla In High Court Against Chhagan Bhujbal Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..