नाशिक : आमदार कांदे यांचा आज जबाब नोंदविणार

suhas kande
suhas kandesakal media
Updated on

नाशिक : नांदगावचे शिवसेनेचे (shivsena) आमदार सुहास कांदे (suhas kande) यांचा जबाब (statement) मंगळवारी (ता. २) सकाळी पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak pandey) नोंदवून घेणार आहेत. याच प्रकरणातील अक्षय निकाळजे (akshay nikalje) यांचाही जबाब घेण्यात येणार असून, या चौकशीत (investigation truth) काय तथ्य समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

suhas kande
बेळगाव : अशिक्षित कैद्यांना होणार अक्षर ओळख; गृहखात्याचा प्रस्ताव

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी धमकाविण्यात आल्याच्या आरोपावर आमदार सुहास कांदे यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची प्राथिमक चौकशी काही दिवसांपूर्वी पूर्ण झाली. मात्र, दोन्ही पक्षांकडून महत्त्वाचे ठरलेले कॉल रेकॉर्डिंग सादर झाले नाही. हा चौकशी अहवाल समोर आल्यानंतर पोलिस आयुक्तांनी स्वत: पुढील चौकशीची धुरा आपल्याकडे घेतली.

कुख्यात छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोनवरून धमकाविल्याची तक्रार शिवसेनेचे आमदार कांदे यांनी पोलिस आयुक्तांकडे केली होती. या लेखी तक्रारीची चौकशीची जबाबदारी गंगापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्याकडे सोपविली होती. श्री. शेख यांनी कांदे आणि निकाळजे यांच्यासह अन्य तिघांचे जबाब नोंदविले. मात्र, यात महत्त्वाचे पुरावे समोर आले नाहीत. त्यात एकमेकांवर आरोप करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर चौकशी अहवाल समोर आल्यानंतर पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी दोघांकडे पुन्हा चौकशी करण्याचे नियोजन आखले. त्यानुसार आता मंगळवारी सकाळी अकराला आमदार सुहास कांदे यांचा, तर दुपारी चारला निकाळजे यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. या तक्रारीच्या केंद्रस्थानी पालकमंत्री छगन भुजबळ असून, पोलिस आयुक्तांच्या संभाव्य चौकशीकडे आणि समोर येणाऱ्या तथ्यांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com