नाशिक- राज्य शासनाच्या पहिलीपासूनच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे रविवारी (ता. २९) आंदोलन करण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची होळी करताना शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.