

Sealed Anganwadi Nutrition Pack Sparks Concern After Dead Bird Claim in Devgaon
sakal
देवगाव : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प निफाड-१ अंतर्गत देवगाव बिट क्रमांक २ मधील हनुमान मंदिराजवळ असलेल्या इंदिरानगर अंगणवाडी केंद्रातून लाभार्थ्यांना घरपोच पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. मात्र, या पोषण आहाराच्या बंद पाकिटात मृत पक्षी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.