नाशिक : लस घ्या; पण पॅरासिटामॉल मिळणार नाही | Shortage of paracetamol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paracetamol

नाशिक : लस घ्या; पण पॅरासिटामॉल मिळणार नाही

मनमाड (जि. नाशिक) : कोरोना (Corona) प्रतिबंधक लशीचा (Vaccine) डोस टोचल्यानंतर ताप येणे, डोके दुखणे, अंग दुखणे अशी लक्षणे जाणवतात. त्यामुळे लस टोचल्यानंतर दोन गोळ्या लस देणाऱ्या सिस्टरकडून हाती ठेवल्या जातात. परंतु, अलीकडे लस घेतल्यावर गोळी दिली जात नसल्याने लसवंत नागरिकांना खासगी मेडिकलमधून गोळी विकत घ्यावी लागत आहे.

कुठल्याही शासकीय दवाखान्यात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन (Prescription) आणि रुग्णाच्या हाती पडणारी पहिली गोळी म्हणजे पॅरासिटामॉल (Paracetamol). बहुविध आजारांवर प्राथमिक उपचार म्हणून चालणारी पॅरासिटामॉल गोळीचा सध्या तुटवडा आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस टोचल्यानंतर ताप येणे, डोके दुखणे, अंग दुखणे अशी लक्षणे जाणवतात. त्यामुळे लस टोचल्यानंतरही हीच गोळी हाती ठेवली जाते. परंतु, अलीकडे लस केंद्रावर ही गोळी दिली जात नाही. त्यामुळे लसवंतांना पैसे खर्च करून खाजगी मेडिकलमधून गोळी विकत घ्यावी लागत आहे तर अनेकांना गोळी माहीत नसल्याने दुखणे अंगावर काढावे लागत आहे तर काहींना दवाखान्यात जावे लागत आहे आजारात प्राथमिक उपचार म्हणून पॅरासिटामॉल गोळीला मोठे महत्त्व आहे. ताप, अंगदुखी, डोकेदुखीसाठी ही गोळी दिली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा कुठल्याही सरकारी दवाखान्यांत पहिली ही गोळी रुग्णांच्या हाती पडत असल्याने तिचे नावही सगळ्यांच्याच तोंडी. अनेकदा 'काही नाही पॅरासिटामॉल' हाती ठेवतात, सरकारी दवाखान्यांत दुसऱ्या चांगल्या गोळ्या नसतात' असेही म्हटले जाते. सर्वात स्वस्त असणारी ही प्राथमिक उपचाराची गोळी आहे. आरोग्य यंत्रणेने गोळ्या उपलब्ध करून लस घेतांना लसवंतांना गोळ्या देण्याची मागणी होत आहे

हेही वाचा: दुषित पाण्यामुळे नाशिककरांच आरोग्य धोक्यात...

लस घ्या; पण गोळी नाही

कोरोना प्रतिबंधक लस टोचल्यानंतर बहुतांशी रुग्णांना ताप, डोकेदुखी व अंगदुखी अशी लक्षणे जाणवतात. त्यामुळे लस टोचताच हातावर दोन गोळ्या दिल्या जातात.मात्र, अलीकडे या गोळ्यांच्या तुटवड्यामुळे लस घ्या पण गोळी नाही म्हणण्याची वेळ आरोग्य कर्मचाऱ्यांवर आली आहे.

हेही वाचा: नाशिक : गोरखपूर, नाशिकमध्ये मेट्रो निओ नारळ वाढवणार

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top