Nashik News: आठवड्याच्या अखेरीस सर्वात लहान दिवस अन मोठी रात्र! अवकाशात ग्रहांची रेलचेल

पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्यासंबंधी साडेतेवीस अंशांनी कललेला असल्याने दिनमान वा सूर्याचे उदयास्ताचे स्थान नेहमी बदलत असते.
Shortest day and longest night at end of week nashik news
Shortest day and longest night at end of week nashik newsSakal
Updated on

Nashik News : पृथ्वीवरील सर्वांत लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र आठवड्याच्या अखेरीस म्हणजे, शुक्रवारी (ता.२२) अनुभवता येईल. रात्र मोठी असल्याने अनेक ग्रह पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.

पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्यासंबंधी साडेतेवीस अंशांनी कललेला असल्याने दिनमान वा सूर्याचे उदयास्ताचे स्थान नेहमी बदलत असते. (Shortest day and longest night at end of week nashik news)

२१ मार्च अथवा २३ सप्टेंबरला विषुवदिनी सूर्य निश्‍चित पूर्वेस असतो. २२ डिसेंबरला या अयनदिनी सूर्य अधिक दक्षिणेकडे असून, यावेळी उत्तर गोलार्धात दिनमान कमी म्हणजे, या भागात दिवस सर्वात लहान असतो.

सूर्य इथून पुढे उत्तर बाजूस सरकत जातो. त्याला उत्तरायण म्हणतात. ही स्थिती २१ जूनला पूर्ण होते. हा दिवस आपल्या भागात सर्वात मोठा असतो. २२ डिसेंबरला सूर्य पृथ्वीच्या मकर वृत्तावर असतो. अक्षवृत्तीय स्थितीनुसार जेवढे उत्तर बाजूस जाल, तेवढे दिनमान वाढत जाते आणि उत्तर ध्रुवावर ते सर्वाधिक असते.

Shortest day and longest night at end of week nashik news
Finger Astrology Tips : हाताची बोटंच करतात तुमच्या आरोग्याची भविष्यवाणी; कसे ते पहा!

म्हणून २२ डिसेंबर हा अयनदिन म्हणून सर्वात लहान दिवस असतो. शुक्रवारी (ता. २२) रात्र सर्वात मोठी असल्याने ग्रह-ताऱ्यांच्या दर्शनाची संधी असेल. रात्रीच्या प्रारंभी पूर्वेकडील चंद्र आणि सर्वात मोठा गुरू एकमेकांच्या जवळ आणि यावेळी दक्षिण आकाशात वरच्या बाजूला शनी ग्रह व पहाटे पूर्वेला शुक्र गृह ठळक स्वरूपात पाहता येईल.

पावणेअकरा तासांचा दिवस

शुक्रवारी (ता. २२) पावणेअकरा तासांचा दिवस आणि सव्वातेरा तासांची रात्र असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होऊन दिनमान वाढत जाते. त्यातील फरक मात्र, मकरसंक्रांतीला जाणवतो. म्हणूनच तीळसंक्रांतीपासून दिवस तिळाने वाढतो, अशी भावना सामन्यांमध्ये रूढ झाली आहे.

Shortest day and longest night at end of week nashik news
Astrology नुसार 'हे' दान केल्याने पैशांची तंगी होते दूर, घरात होईल भरभराट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com