Mayor Election: महापौर पदाच्या इच्छुकांमध्ये शो- बाजी; इतर निवडणुकांप्रमाणेच प्रचाराची रणनीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election

Mayor Election: महापौर पदाच्या इच्छुकांमध्ये शो- बाजी; इतर निवडणुकांप्रमाणेच प्रचाराची रणनीती

नाशिक : मध्य प्रदेशच्या धर्तीवर सार्वजनिक निवडणुकीच्या वेळी नगरसेवकांबरोबरच जनतेतूनच थेट महापौर निवडून देण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अनेकांच्या महापौर होण्याच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले आहे. त्या अनुषंगाने नागरिकांपर्यंत विविध समस्या पोचविण्यासाठी कसरत सुरू असल्याचे शहरात दिसून येत आहे. (Show of Mayor Election aspirants Campaign strategy like any other election Nashik News)

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार असताना त्या वेळी वीस वर्षांपासून थेट महापौर व नगराध्यक्ष निवडून देण्याची पद्धत रद्द करून नगरसेवकांमधून निवडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मध्य प्रदेशमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काँग्रेस सरकारचा निर्णय बदलत पुन्हा थेट जनतेतून महापौर व नगराध्यक्ष निवडून आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा मध्य प्रदेशमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजपला फटका बसला. असे असले तरी मध्य प्रदेश सरकारचा थेट जनतेतून महापौर व नगराध्यक्ष निवडून देण्याचा निर्णय संपूर्ण देशभर लागू करण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील या संदर्भात काही महिन्यांपूर्वी वक्तव्य केले होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रदेखील थेट महापौर व नगराध्यक्ष निवडून देण्याचा कायदा होऊ शकतो. असा अंदाज बांधत महापौर पदावर विराजमान होण्याची अत्यंत महत्त्वाकांक्षा असलेल्या काहींनी शहरात विविध प्रकारच्या समस्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Nashik News : मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी युवक ठार

सोशल मीडियावर शोबाजी

थेट लोकांमधून निवडून यायचे असेल तर तेवढी लोकप्रियता हवी. जवळपास लोकसभेप्रमाणेच इच्छुकांना संपूर्ण शहर पिंजून काढावे लागणार आहे. परंतु, लगेचच हा निर्णय शक्य नसला तरी नाशिकमध्ये महापौर पदाचा फीवर चढलेल्या अनेकांना ही महत्वाकांक्षा झोपू देत नाही.

त्यामुळे महापालिका संदर्भातील कामांवर टीका करण्यासाठी माध्यमांसह सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. रस्ते, पाणीपुरवठा ड्रेनेज या नागरिकांच्या दैनंदिन समस्यांसह स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे यापूर्वी माजी महापौर पदाचा शिक्का लागलेल्यांमध्येदेखील चढाओढ सुरू झाली आहे.

हेही वाचा: Success Story : आदिवासी पाड्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या लेकीची PSI पदाला गवसणी