Latest Marathi News | मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी युवक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Nashik News : मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी युवक ठार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिसरोडवर खासगी मिनीबसचे चाक डोक्यावरून गेल्याने अनोळखी ३५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बसचालकास अटक करून मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (unidentified youth killed when wheel of minibus ran over his head Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

हेही वाचा: Nashik News : रस्ते दुरुस्तींच्या निधीतून ‘लिफ्ट’चा घाट?; ZPचा वादग्रस्त निर्णय

पोलीस नाईक सिद्धार्थ बिरारी (रा. पांगरे मळा, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या मंगळवारी (ता. २२) रात्री सव्वा दहाच्या सुमारास सदरची घटना घडली. मुंबई नाका हद्दीतील महामार्गालगत असलेल्या रॉयल इनफिल्ड बुलेटच्या शोरुमसमोर खासगी मिनी बसच्या (एमएच ४६ बीबी ९८१९) खाली अज्ञात युवक झोपलेला होता. बसचालकाने रात्री सव्वा दहाच्या सुमारास निष्काळजीपणे बस चालवून नेली.

त्यावेळी झोपलेल्या अज्ञात युवकाच्या डोक्यावरून बसचे चाक गेले. यात गंभीररित्या जखमी झालेल्या युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, वैदयकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी बसचालक राकेश रमेश परदेशी (३७, रा. बारा बंगला रोड, इगतपुरी) यास अटक करण्यात आली असून, त्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nashik News : शहरात 2 वेगवेगळ्या अपघातांत 2 ठार

टॅग्स :NashikAccident Death News