Crime
sakal
नाशिक: रिक्षा-टॅक्सीचालकांची संघटना असलेल्या ‘श्रमिक सेने’च्याच पदाधिकाऱ्याने टॅक्सीचालकाकडे ७० हजारांची मागणी केली. तसेच द्वारका-कसारा प्रत्येक फेरीमागे शंभर रुपयांची खंडणी मागणाऱ्या या श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात मुंबई नाका पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजप नेते सुनील बागूल यांचा समर्थक असलेल्या या पदाधिकाऱ्याविरोधात खंडणीचा दुसरा गुन्हा दाखल झाला.