Fire Incident
sakal
जुने नाशिक: गंजमाळ येथील श्रमिकनगर आणि पंचशीलनगर भागातील तेरा घरे आगीत खाक झाली. संसारोपयोगी साहित्यासह शैक्षणिक कागदपत्र तसेच अन्य साहित्य जळून लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. अग्निशामक विभागाच्या दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता.२१) सकाळी सव्वासातच्या सुमारास ही घटना घडली.