नाशिक: श्रावण महिना सुरू झाला असून, सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या श्रावण सोमवारी (ता. २८) भाविकांच्या स्वागतासाठी मंदिराचे व्यवस्थापन मंडळ सज्ज आहे. पुढील महिनाभर मंदिरांमध्ये विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महिनाभर हर, हर महादेवचा जयघोष होणार आहे. पुरातन मंदिरांसोबत विस्तारत असलेल्या शहरात उभारण्यात आलेली शिवमंदिरांच्या परिसरात आकर्षक सजावट, रोषणाई केली आहे. भाविकांचा वाढता ओघ लक्षात घेता, धार्मिक, सामाजिक उपक्रमांचे आयोजनदेखील अनेक मंदिरांमध्ये केले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी भाविकांना उपलब्ध असेल.