ओझर- हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) येथील कामगार संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी श्री आपला जागृती पॅनलने तब्बल २९ जागा जिंकून सत्तेवर शिक्कामोर्तब केले. अध्यक्षपदी अनिल मंडलिक सलग दुसऱ्यांदा निवडून आले; तर सरचिटणिसपदी संजय कुटे यांचा ३१२ मतांनी विजय झाला. या निवडणुकीत विरोधी श्री श्रमशक्ती पॅनलला केवळ दोनच जागा मिळाल्या असून, या पॅनलचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार गणेश गवारे, सहचिटणीसपदाचे उमेदवार योगेश अहिरे विजयी झाले.