प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र उनपदेव

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेले श्रीक्षेत्र उनपदेव
Published on: 
NSK26H32158 चोपडा : तालुक्यातील श्रीक्षेत्र उनपदेव या श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र स्थळावरील गरम पाण्याच्या झऱ्याचे गोमुख व पाण्याचे कुंड. ------ NSK26H32160 श्रीक्षेत्र उनपदेव येथील मंदिर. NSK26H32159 (सुनील पाटील) प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन : श्रीक्षेत्र उनपदेव ---------------------------------------- अडावद (ता.चोपडा) येथून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्यटनकेंद्र तथा तिर्थक्षेत्र उनपदेव हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. प्रभू श्रीराम हे चौदा वर्ष वनवास भोगत असताना प्रभू श्रीरामांनी उनपदेव येथे भेट दिली असता, त्या ठिकाणी महर्षी शरभंग ऋषी कुष्ठरोगी असल्याने त्यांच्या रोगनिवारणार्थ जमिनीत बाण मारून निघालेल्या जलधारेतून याठिकाणी गरम पाण्याच झरा अवतरला.. आजतागायत उनपदेवचा हा गरम पाण्याचा झरा व कुंड कायम असून ते पर्यटकांसाठी श्रद्धाभक्तीसह उत्सुकतेचे क्षेत्र बनले आहे. - सुनील पाटील, चोपडा प्रभू श्रीराम यांनी लंकाधीश रावणाचा वध करून उनपदेव येथील शरभंग ऋषीचा आश्रमात पोहचले. शरभंगस्थ सदेह स्वर्ग गमनम असा उल्लेखही उनपदेवचा आहे. महर्षी शरभंग ऋषी कुष्ठरोगी असल्याने त्यांना रोगापासून मुक्त करण्यासाठी प्रभू श्रीराम यांनी अग्नी बाण जमिनीत रोवला. त्या वेळी जमिनीतून निघालेल्या जलधारेत महर्षी शरभंग ऋषी यांनी स्नान केल्याने महर्षी रोगमुक्त झाले ही जलधारा म्हणजे उनपदेव येथील गरम पाण्याच्या झऱ्याची निर्मिती केली अशी आख्यायिका आहे. गोमुखातून गरम पाणी आजही गो-मुखातून अव्याहतपणे गरम पाणी वाहत आहे. हे गरम पाणी कसे सतत वाहते असा प्रश्न आजही या ठिकाणी येणाऱ्या जिज्ञासू पामरांना पडत असतो. विज्ञानवादी त्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून विश्‍लेषण करतात. या जमिनीखाली गंधकाचा साठा असावा आणि ज्या ठिकाणी गंध असते, त्या ठिकाणच्या भूगर्भातून गरम पाण्याचा झरा येऊ शकतो, असा दावा विज्ञानवादी करीत असतात. अर्थात, तरीही ज्यांची श्रद्धा आहे असे हजारो भक्तगण महाराष्ट्र राज्यासह जवळच्या मध्यप्रदेश, गुजरातमधून दर्शनाला येत असतात. उनपदेवची प्रसिद्ध यात्रा श्री क्षेत्र उनपदेव हे अडावदपासून उत्तरेला सहा किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. येथे पौष मासारंभापासून महिनाभर यात्रोत्सव सुरु असतो. हा यात्रोत्सव दरवर्षी महिनाभर सुरु असतो, यासाठी येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी हजेरी लावतात. महिनाभर चालणाऱ्या या यात्रोत्सवात मोठी आर्थिक उलाढाल होत असते. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांना मोठा रोजगार उपलब्ध होतो. परिसरातील ग्रामस्थांसाठी हा यात्रोत्सव म्हणजे एक पर्वणी असते. येथे राज्यभरातून दाखल होणाऱ्या भाविकाची गैरसोय होऊ नये, यासाठी देवस्थानाची व्यवस्था व देखभालाची जबाबदारी वनसंरक्षण समिती (अडावद) व वनविभागाकडे आहे. ---- कधी व कसे जावे? श्री क्षेत्र उनपदेव हे जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील अडावदपासून उत्तरेला सहा किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी आहे. चोपडा शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर अडावद गाव आहे. अडावदपासून सहा किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र उनपदेव आहे. येथे पौष मासारंभापासून महिनाभर यात्रोत्सव सुरु असतो. हा यात्रोत्सव दरवर्षी महिनाभर सुरु असतो, यासाठी येथे देशभरातील भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी हजेरी लावतात. या वेळी दर्शनासाठी यावे. पर्यटनस्थळ विकासाच्या दिशेने... याठिकाणी लहान मुलांसाठी उद्यान विकसित करण्यात आले आहे. त्यात विविध खेळणी, मिनी रेल्वे ट्रॅक आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. उनपदेवच्या पूर्वेस व पश्चिमेस जास्तीत जास्त पाझर तलाव होणे गरजेचे आहे, त्यातून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. सध्या पाण्याचा स्रोत कमी झाला आहे. वनविभागाने बरीच कामे मंजुरीसाठी पाठविली आहेत. ही कामे लवकर मंजूर झाली तर पर्यटनस्थळाचा विकास होणार आहे. चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांचा निधीतून उनपदेव येथे गेल्या वर्षी एक सोलर लॅम्प बसविण्यात आला. अन्य कामेही प्रस्तावित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.